क्राईमठळक बातम्या

Lalit Patil : मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवून नेलं.. ललीत पाटीलचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : पुण्यातील ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील (Lalit Patil) हा आरोपी 2 ऑक्टोबर रोजी पळून गेला होता. त्या घटनेला 15 दिवसांचा कालावधी होऊन देखील आरोपी ललित पाटीलचा शोध लागत नव्हता. आज अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले. मुंबई पोलिसांनी त्याला तामिळनाडूील चेन्नई येथून अटक केली आहे.

ललित पाटील याला आता मुंबईत आणलं गेलं असून लवकरच कोर्टात सादर करण्यात येणार आहे. ललीत पाटील 300 कोटींची ड्रग्ज फॅक्टरी चालवतो. त्यामुळे त्याचे नेटवर्क देशभरात पसरले आहे. यामुळे पोलिसांना ललित पाटीलला पकडणे खूप कठीण झाले. ललीत पाटीलला अंधेरीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये आणण्यात आले आहे. यानंतर त्याला पुणे कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.

ललीत पाटील पुण्याहून नाशिकला गेला होता असे समोर येत आहे. नाशिकनंतर तो इंदौरला गेला. इंदौरनंतर तो गुजरात सुरतला गेला. यानंतर तो पुन्हा नाशिकला आला. यानंतर धुळे, संभाजीनगर, कर्नाटक, बंगळूर, चैन्नईपर्यंत प्रवास केला. यानंतर तो श्रीलंकेत जाण्याच्या तयारीत होता, असे समोर आले आहे. तसेच मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवून नेलं..कोणाचा हात आहे सर्व सांगेन असा गौप्यस्फोट ललीत पाटीलने केला आहे. ललीत पाटीलला या प्रवासात त्याला कोणी मदत केली, टुरीस्ट गाडी कोणी करुन दिली, त्याच्यासोबत कोण होते? या सर्वांची मुंबई पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. त्याच्या या गौप्यस्फोटामुळे मोठी खळबळ उडाली आहे.