Lalit Patil

Lalit Patil Case : मोठी कारवाई ! ललित पाटील प्रकरणात ‘हे’ दोन पोलीस अधिकारी बडतर्फ

410 0

पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil Case) पलायन प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये पुणे पोलीस दलातील आणखी दोन पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा केल्याप्रकरणी पोलीस आयुक्तांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे आणि सहाय्यक फौजदार जनार्दन काळे अशी बडतर्फ करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.

पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना तिथूनच ड्रग्ज रॅकेट चालवणाऱ्या ललित पाटीलने पलायन केल्यानंतर खळबळ उडाली होती. ललित पाटीलला अटक केल्यानंतर रोजी नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. त्याच्या पलायन प्रकरणी याआधी दोन पोलिसांना बडतर्फ केले होते. नाथा काळे आणि अमित जाधव अशी त्यांची नावे आहेत. आतापर्यंत या प्रकरणी एकूण 10 पोलिसांना बडतर्फ करण्यात आले आहे.

तसेच यादरम्यान ससून रुग्णालयाचे तत्कालीन डीन संजीव ठाकूर यांचा मुलगा डॉ. अमेय ठाकूर यांनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ललित पाटील प्रकरणामुळे डॉ. संजीव ठाकूर यांना पदमुक्त केल्यानंतर अमेय ठाकूर यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते ससून रुग्णालयात सर्जरी विभागाचे प्राध्यापक म्हणून काम पाहत होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Travels on Fire : हज यात्रेला निघालेल्या ट्रॅव्हल्सला तासवडे टोलनाक्याजवळ लागली भीषण आग

RBI : महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; परवाना केला रद्द

Pune Accident : पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात; CCTV फुटेज आले समोर

Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस

Crime News : छ. संभाजीनगर हादरलं ! ‘या’ शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची हत्या

Hanjala Adnan : लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हंजला अदनानची अज्ञाताकडून हत्या

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!