Crime

Chhatrapati Sambhajinagar Crime News : दोन महिलांच्या भांडणात कुत्र्याचा बळी; छ. संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

496 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन महिलांच्या भांडणात एका कुत्र्याला नाहक आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातील दगडगल्ली कुंभारवाडा परिसरात ही घटना घडली आहे.या प्रकरणात संबंधित महिलेवर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा (Chhatrapati Sambhajinagar Crime News) दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
शेजारी -शेजारी राहणाऱ्या दोन्ही महिलांनी कुत्रं पाळलं होतं. त्यांच्या कुत्र्यांची भांडणं झाली. त्यानंतर या कुत्र्यांवरून दोन्ही शेजारनीमध्ये तुफान राडा झाला. दोघींची भांडणं सुरू असताना आरोपी महिलेला दुसऱ्या महिलेचा कुत्रा दिसला. हा कुत्रा आपल्या कुत्र्याच्या अंगावर धावून आला. तसेच आता त्याची मालकीन देखील आपल्याशी भांडण करत असल्याचा या महिलेला राग आला.

Oscar New Rules : ‘ऑस्कर’चे नवे नियम जाहीर; चित्रपट निर्मात्यांना आता ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन

यानंतर आरोपी महिलेने रागाच्या भरात कुत्र्यावर विटांचे प्रहार केले. या घटनेत कुत्र्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर आपल्या कुत्र्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी कुत्र्याच्या मालकीनीने संबंधित महिलेच्या विरोधात सिटीचौक पोलीस स्टेशनमध्ये (Chhatrapati Sambhajinagar Crime News) गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!