Solapur News

Solapur News : सोलापूर हादरलं ! एकतर्फी प्रेमातून घडलं हत्याकांड; ऋतुजासोबत नेमकं काय घडलं?

817 0

सोलापूर : सोलापूरमधून (Solapur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये तू माझी झाली नाही तर ,कुणाचीही होऊ देणार नाही, असे सांगत एकतर्फी प्रेमातून एका तरुणीची हत्या करण्यात आली आहे. ही घटना सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री घडली आहे. आरोपीने धारदार हत्याराने डोक्यात, गळ्यावर, पाठीवर, हातावर मानेवर गंभीर वार करून तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. ऋतुजा दादासो मदने (वय 18, राईराची वाडी, ता सांगोला) असे त्या तरुणीचे नाव आहे. तर सचिन मारुती गडदे (रा. गौडवाडी, ता सांगोला) असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी सचिन हा ऋतुजावर प्रेम करत होता. तो ऋतुजाच्या मागे लग्न कर म्हणत होता पण घरच्यांनी तिचा विवाह समाधान कोळेकर सोबत केला होता. मात्र लग्नानंतर दोनच वर्षांनी ऋतुजा आणि समाधान यांच्यात वाद होत दोघांमध्ये घटस्फोट झाला होता.या घटस्फोटाला संचिन गडदे कारणीभूत होता.त्यानंतर पुन्हा ऋतुजाचा व सचिन गडदे यांचा संपर्क झाला होता. तेव्हाही तो माझ्याबरोबर लग्न कर असा दबाव टाकत होता.ऋतुजाने सचिन सोबत संपर्क कमी करत समाधान कारंडे (रा. कारंडेवाडी ता सांगोला जि सोलापूर) याच्याबरोबर तिचे प्रेम संबंध निर्माण झाले होते. ऋतुजा आणि समाधान दोघे पळून जाऊन लग्न करणार होते. ही गोष्ट सचिनला समजताच तो ऋतुजावर भडकला.

ऋतुजा सचिन गडदेशी लग्न करण्यास तयार नसल्याने तो तिच्यावर चिडून होता.त्यामुळे संशयित आरोपी सचिनने डाव साधला.ऋतुजा शनिवारी सायंकाळी घरात एकटीच होती.ऋतुजाची आई दूध डेअरीवर कामावर गेली होती. वडील मूकबधीर आहेत याचा फायदा घेऊन संशयित आरोपी सचिनने घातक हत्यारांनी गळ्यावर हातावर वार करून तिचा खून केला. पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी याचा पुढील तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!