Dhule Death

देशसेवेचे स्वप्न राहिले अधुरे; NDA तील विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

1856 0

धुळे : धुळे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणाचा हाडाखेड तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या तलावात पोहत असताना मासे पकडण्यासाठी टाकण्यात आलेल्या जाळ्यात पाय अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

काय घडले नेमके?
शिरपूर येथील दादुसिंग कॉलनी परिसरात राहणारा हिमांशू शरद चौधरी (मुळगाव जापोरा ता. शिरपूर) हा आपल्या मित्रांसोबत शिरपूर तालुक्यातील हाडाखेड पासून दोन ते तिन किमी अंतरावर असलेल्या डॅममध्ये सायंकाळी पोहण्यासाठी गेला होता. यादरम्यान पोहत असताना हिमांशूचा पाय पाण्यात मासे पकडण्यासाठी पसरवलेल्या जाळ्यात अडकला आणि त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच हिमांशूच्या मित्रांनी आरडाओरड केली. त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पुर्णपणे पाण्यात बुडाला होता. यानंतर त्याच्या मित्रांनी हिमांशूच्या वडिलांना याची माहिती दिली. त्यानंतर त्याचा तात्काळ पाण्यात शोध सुरु केला असताना रात्रीच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला. विशेष बाब म्हणजे, हिमांशू चौधरी याची काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मध्ये निवड झाली होती. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!