Dhule News

Dhule News : धक्कादायक ! बहिण भावाचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू

678 0

धुळे : धुळ्यातून (Dhule News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये झोपडीला लागलेल्या आगीत होरपळून दोन भावंडांचा जागीच मृत्यू झाला आहे. धुळ्यातील लोणखेडी या ठिकाणी झोपडीला आग लागून आजोळी आलेल्या नाशिक येथील बहिण भावाचा करुण अंत झाला आहे. या घटनेमुळे धुळ्यात शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रेणू पवार, अमोल पवार अशी मृत बालकांची नावे आहे. त्यांचे आई वडील ऊस तोडीसाठी बारामतीला गेले असल्याची माहिती गावकऱ्यांकडून देण्यात आली. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम उशिरा पर्यत सुरू होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
नाशिकच्या सटाणा तालुक्यातील वडील दिंगरी येथील रहिवाशी असलेले नाना पवार यांना चार वर्षांची मुलगी रेणू व सात वर्ष वयाचा अमोल हा मुलगा आहे. नाना पवार यांची पत्नीचे माहेर हे धुळ्याच्या लोणखेडी येथे आहे. पवार दाम्पत्य हे ऊस तोडीसाठी पुणे जिल्हयातील बारामतीला गेले होते. त्यामुळे अमोल व रेणू हे दोघेही आजीसोबत लोणखेडी येथे थांबले होते. गावबाहेर एका टेकडीवर आजीसोबत झोपडीत ही मुले राहत होती. बालकांची आजी गुरांना पाणी देण्यासाठी बाजूला गेल्या होत्या. त्याचवेळी झोपडीला आग लागली.

घर टेकडीवर असल्यामुळे वाऱ्यामुळे आगीने जोर धरत झोपडीतील साहित्य व पालापाचोळ्याचे छताने पेट घेतला. या घटनेत रेणू व अमोल झोपडीतच अडकले. आजीने हा सगळा प्रकार पाहताच तिने आरडा ओरडा सुरु केला आणि मदत मागण्यास सुरुवात केली. त्यामुळे बाहेरुन बचावासाठी उशिराने प्रयत्न सुरू झाला. दुर्दैवाने या घटनेत दोन्ही मुलांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Rajkumar Santoshi : चित्रपट निर्माते राजकुमार संतोषी यांना चेक बाऊन्स प्रकरणी जामीन मंजूर

IND Vs ENG : टीम इंडियाने राजकोटमध्ये रचला इतिहास ! कसोटी क्रिकेटमध्ये मिळवला आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय

Pune News : शिक्षण हक्क कायद्यातील बदल मागे घ्या; आम आदमी पार्टीची मागणी

Ritesh Deshmukh : काका पुतण्याचं नातं कसं असावं? रितेश देशमुखांनी दिलं उदाहरण

Onion Export Ban : मोठी बातमी! केंद्र सरकारने अखेर कांद्यावरील निर्यातबंदी उठवली

Concentration : एकाग्रता कमी पडतीय तर करा ‘हा’ व्यायाम; झटपट दिसेल बदल

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये मिनीबसचा भीषण अपघात

Manoj Jarange Patil : 20 फेब्रुवारीपर्यंत सगेसोयरेची अंमलबजावणी न झाल्यास…; जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा प्लॅन

Supriya Sule : ‘हा भातुकलीचा खेळ नाही’; बारामतीच्या लढतीवरुन सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

Amravati Accident News : अमरावतीमध्ये भीषण अपघात ! चौघांचा मृत्यू तर 10 जण जखमी

Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत होणार मोठा बदल; ‘हे’ रस्ते राहणार बंद

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!