Dhule Crime

भरधाव कारने दिलेल्या धडकेत इंजिनिअर तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

11377 0

धुळे : धुळे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका इंजिनिअर तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये शेतात पायी जाताना भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने मागून जोरदार धडक दिल्यामुळे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही अपघाताची घटना चिमठाणे-साळवे कच्च्या रस्त्यावर घडली आहे. प्रथमेश ऊर्फ पप्पू भीमराव अहिरे-धनगर असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रथमेश हा एकुलता एक असल्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाताप्रकरणी शिंदखेडा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

काय घडले नेमके?
दुपारी दीड वाजताच्या सुमारास प्रथमेश ऊर्फ पप्पू भीमराव अहिरे-धनगर (वय 23) (Prathamesh Bhimrao Ahire-Dhangar) हे चिमठाणे गावाकडून शेतात पायी जात असताना त्याला मागून (एमएच 18, डब्ल्यू 1273) या चारचाकी वाहनाने मागून धडक दिली. यामध्ये प्रथमेशच्या छातीला, पोटाला व डोक्याला जबर मार लागल्याने तो जमिनीवर पडला. या अपघातानंतर (Accident) आरोपी कार चालक घटनास्थळी कार सोडून पळून गेला.

यानंतर गावकऱ्यांनी जखमी प्रथमेशला उपचारासाठी शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन वाघ यांनी प्रथमेश यास तपासून मृत घोषित केले. या अपघाताप्रकरणी प्रथमेशचे चुलत काका संतोष हिलाल धनगर-अहिरे यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात (Shindkheda Police Station) फिर्याद केली आहे. पोलिस निरीक्षक सुनील भाबड (Police Inspector Sunil Bhabad) यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सदेसिंग चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!