धाराशिव : धाराशिव तालुक्यात एक खळबळजनक घटना (Crime News) घडली आहे. यामध्ये वानेवाडी येथील आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांच्या संशयास्पद मृत्यू (Crime News) झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना समोर येताच मुलाच्या वडिलांनी एक गंभीर आरोप केला आहे. यामध्ये धाराशिव तालुक्यातील नारायण बाबा रामजी बाबा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दोरखंडाला लटकवलेल्या अवस्थेत मृतदेह
मृत तरुणाचे नाव प्रेम शिंदे आहे. धाराशिव तालुक्यातील वानेवाडीमध्ये वारकरी संप्रदायाची शिक्षण देणारी नारायण बाबा रामजी बाबा वारकरी शिक्षण संस्था आहे. या संस्थेमध्ये तो दहावीत शकत होता. शनिवारी त्याचा मृत्यू झाला. प्रेम शिंदे याचा मृतदेह दोरखंडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्याने आत्महत्या केली असावी संशय प्रथमदर्शनी वर्तवण्यात आला होता. मात्र, आपल्या मुलाने आत्महत्या केली नसून त्याला मारहाण करून लटकवण्यात आल्याचा आरोप त्याच्या वडिलांकडून करण्यात आला आहे. यामुळे चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे.
संस्थाचालकाला घेतले ताब्यात
याप्रकरणी (Crime News) आश्रमशाळेचे संस्थाचालक उंबरे महाराज यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर ही आत्महत्या आहे की हत्या हे स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा सध्या कसून तपास करत आहे. लवकरच प्रकरणाचा उलगडा होईल असेदेखील पोलीस म्हणाले आहेत.