Fire

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर झालेल्या दुर्घटनेप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली

897 0

मुंबई : पुणे-मुंबई महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) खंडाळा घाटातील (Khandala Ghat) कुणे पुलावर (Kune Bridge) भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये केमिकलची वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याने हा अपघात झाला आहे. या टँकरने जागीच पेट (Fire) घेतल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या भीषण आगीमध्ये 4 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर 3 जण गंभीर जखमी आहेत.या प्रकरणावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पुणे महामार्गावर झालेल्या एका अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 3 जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. राज्य पोलिस दल, महामार्ग पोलिस, आयएनएस शिवाजी, अग्निशमन दल अशा सर्व यंत्रणा घटनास्थळी असून आता आग आटोक्यात आली आहे. एका बाजूने वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून, दुसराही मार्ग लवकरच सुरू होईल. राज्य सरकार स्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!