Delhi News

Delhi News : ट्रेडमिलवर धावताना शॉक लागून इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू

678 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमध्ये (Delhi News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये व्यायाम करताना ट्रेडमिलवर धावताना शॉक लागून एका इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे (Delhi News) मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या तरुणाच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर जीम चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सक्षम प्रूथी असे मृत पावलेल्या इंजिनिअरचे नाव आहे. तो रोहिणी सेक्टर 19 मध्ये तो राहात होता. याच परिसरात असणाऱ्या जिम्प्लेक्स फिटनेस जोनमध्ये तो नियमित व्यायाम करण्यासाठी जात होता.

Amravati News : झाडाचा आश्रय घेणे पडले महागात; वीज पडून काका-पुतण्याचा मृत्यू

काय घडले नेमके?
सक्षम हा बीटेक इंजिनिअर होता. गुरुग्राममधल्या एका खासगी कंपनीत तो कामाला होता. घटनेच्या वेळी सकाळी 7.30 वाजता नेहमीप्रमाणे सक्षम व्यायाम करण्यासाठी जिम्प्लेक्स फिटनेसमध्ये गेला. सुरुवातीला तो ट्रेडमिलवर एक्सरसाईज करत होता. यादरम्यान अचानक ट्रेडमिलमध्ये विद्युत पुरवठा उतरला आणि सक्षमला विजेचा धक्का लागला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर जिममधल्या इतर लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Ashish Sakharkar Passes Away : मराठमोळा शरीर सौष्ठवपटू आशिष साखरकरचं निधन; त्याची ‘ती’ शेवटची पोस्ट होतेय व्हायरल

या घटनेची (Delhi News) माहिती मिळताच पोलीस जिम्प्लेक्स फिटनेसमध्ये दाखल झाले आणि त्यांनी या घटनेचा पुढील तपास सुरु केला. यानंतर सक्षमचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला. पोस्टमॉर्टेमच्या रिपोर्टमध्ये त्याचा मृत्यू विजेचा धक्का लागून झाल्याचे समोर आले आहे. सक्षमच्या कुटुंबियांनी याप्रकरणी जीम चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!