Jalgaon News

Jalgaon News : खेळताना लोखंडी सळी छातीत घुसून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

530 0

जळगाव : जळगाव जिल्ह्यातून (Jalgaon News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये गटारीच्या बांधकामाची उघडी असलेली लोखंडी सळी छातीत घुसून एका 12 वर्षीय चिमुकल्याला आला जीव गमवावा लागला आहे. विशाल रवींद्र भिल असं या मुलाचं नाव आहे. यामुळे ऐन दिवाळीत आपल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने विशालच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

काय घडले नेमके?
ही घटना पाचोरा येथील जुन्या धरणगाव रस्त्यालगत घडली आहे. गटारीच्या बांधकामाची उघडी असलेली लोखंडी सळी छातीत घुसून विशाल याचा मृत्यू झाला आहे. तो बांधकाम सुरू असलेल्या गटारी जवळ खेळत होता. खेळताना तो खाली पडला. यावेळी तिथे असलेली लोखंडी सळी त्याच्या छातीत घुसली. या घटनेत विशालचा जागीच मृत्यू झाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान या प्रकरणात स्थानिक नागरिकांकडून ठेकेदारावर आरोप करण्यात आला आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या प्रकरणात एरंडोल पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!