Beed:

तरुणांच्या स्टेटसला दाऊद इब्राहिमचे फोटो आणि आक्षेपार्ह मजकूर; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

322 0

गुन्हेगारांचं उदत्तीकरण करण्याचे प्रमाण तरुणांमध्ये वाढत असलेला दिसून येत आहे. त्यातच सोशल मिडियावर तीन तरुणांनी दाऊद इब्राहिमचे स्टेटस ठेवून दोन धर्मात तेढ निर्माण होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमिर इनामदार (रा. इनामदारवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली), अरबाज मनियार (रा. पाषाणकरबाग, लोणी काळभोर, ता. हवेली) आणि जुबेर तांबोळी (रा. प्राचिन शिवालयाजवळ, लोणी काळभोर, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत. याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष कमलेश दत्तात्रय काळभोर (वय 40, धंदा व्यवसाय, रा. पांढरीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 20 ऑक्टोबरला सायंकाळच्या सुमारास कमलेश काळभोर हे सोशल मिडीया पाहत असताना त्यांनी अमिर इनामदार, अरबाज मनियार, जुबेर तांबोळी या आरोपींनी कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम व लॉरेन्स बिष्णोई यांचे फोटो स्टेटसला लावले होते. त्याचबरोबर फोटोवर हिंदू- मुस्लिम समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचा आशय लिहिलेला होता. या प्रकरणाची कमलेश काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

समाज माध्यमांवर समाजात तेढ निर्माण करणाऱ्या, सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या, आक्षेपार्ह व खोट्या बातम्या, व्हिडिओ किंवा पोस्ट करणाऱ्यांवर पोलिसांची नजर असून अशाप्रकारचे स्टेटस सोशल मिडीयावर ठेवल्याचे अधलून आल्यास तत्काळ पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहनही आता पोलिसांनी केले आहे.

Share This News
error: Content is protected !!