crime news

Nagpur Crime : नागपूर हादरलं ! सुनेला नडली आणि सासू जीवानिशी मुकली

4625 0

नागपूर : नागपूर (Nagpur Crime) शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये सुनेने आपल्या 80 वर्षांच्या वृद्ध सासूची हत्या केली आहे. सुनेनं सासूवर चाकूनं वार करत तिची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नागपूर शहरातील प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या संभाजी चौक परिसरात ही घटना घडली आहे. ताराबाई शिखरवार असे मृत पावलेल्या वृद्ध सासूचे नाव आहे. तर पूनम आनंद शिखरवार असे आरोपी सुनेचे नाव आहे.

काय घडले नेमके?
हाती आलेल्या माहितीनुसार, सासू आणि सुनेचं काहीतरी कारणावरून भांडण झालं. भांडणाचा राग अनावर झाल्यानं सून पूनम शिखरवार हीने आपली सासू ताराबाई शिखरवार यांच्यावर चाकूनं वार करत त्यांची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

या हत्याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी आरोपी सुनेविरोधात गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक केली आहे. प्रतापनगर पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!