Viral Video

Viral Video : शेळ्या चोरल्याच्या संशयावरून दलित व्यक्तीला उलटं टांगून मारहाण

969 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावामध्ये काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना (Viral Video) घडली होती. यामध्ये शेळ्या चोरल्याच्या संशयावरून तीन दलितांना उलटं टांगण्यात आलं होतं. आता असाच प्रकार तेलंगणातील मंचिरियाल जिल्ह्यात घडला आहे. शेळ्या चोरल्याच्या संशयावरून येथे एका दलित व्यक्तीला आणि त्याच्या मित्राला शेडमध्ये उलटे टांगून त्यांचा अमानुष छळ करण्यात आला आहे.

https://twitter.com/Topnewsmarathi/status/1698334098815852866

कोमुराजुला रामुलू यांच्या शेळ्या बेपत्ता झाल्या होत्या. शेळी चोरल्याच्या संशयावरून एक गुराखी तेजा आणि त्याचा दलित मित्र चिलुमुला किरण यांना शेडमध्ये बोलावण्यात आले. रामुलू, त्याची पत्नी आणि मुलाने त्या तिघांना उलटे लटकवले आणि बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर उलटं टांगून त्यांना धुरी देण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. बेल्लमपल्ली एसीपी सदैया आणि एसएसआय चंद्रकुमार यांनी शनिवारी घटनास्थळाची पाहणी केली. तर, याप्रकरणी कोमुराजुला रामुलू, त्यांची पत्नी स्वरूपा आणि मुलगा श्रीनिवास या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

Share This News
error: Content is protected !!