लाइक बटनावर क्लिक केले आणि माजी सैनिकाच्या खात्यातून १ कोटी लंपास झाले

586 0

पुणे शहरात ऑनलाईन फसवणूक होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. क्षणिक मोहापायी सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकून लोक लाखो रुपयांची फसवणूक करून घेतात. यामध्ये सुशिक्षित लोकांची संख्या अधिक आहे. असाच एक प्रकार माजी सैनिकाच्या बाबतीत घडला आहे.

ऑनलाईन फ्रॉड करणारे सायबर चोरटे रोज नवी शक्कल लढवून तुमची आयुष्यभराची कमाई लंपास करतात. नुसते क्लिक केल्यानंतर लाखोंची कमाई होते या ऑफरला फसून एका माजी सैनिकाने तब्बल १ कोटी रुपयांची रक्कम घालवून बसला आहे. एक लाईक करा अन् 50 रुपये कमवाच्या या माध्यमातून ही फसवणूक झाली आहे. याबाबत सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या तक्रारीत म्हटले आहे की, एक मेसेजिंग अ‍ॅप डाउनलोड केला होता, ज्यामुळे ग्रुप चॅटिंग करता येते. तिथे त्याला एका अनोळखी व्यक्तीचा मेसेज आला, ज्यामध्ये त्याला सोप्या कामांसाठी खूप पैसे मिळत असल्यचा दावा करण्यात आला. हे काम म्हणजे व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवर लाईक बटणावर क्लिक करण्याचे होते. सुरुवातीला केलेल्या कामाचे त्यांना वेलकम बोनस म्हणून 1,000 मिळाले. फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना या कामांवर अधिक परतावा देण्यासाठी गुंतवणुकीची ऑफर दिली. या ऑफरला भुलून या माजी सैनिकाने गुंतवणूक केली. सायबर चोरटयांनी माजी सैनिकाच्या पाच बँकांमधील सुमारे एक कोटी रुपये लंपास केले. ही ऑनलाइन फसवणूक 13 ते 26 फेब्रुवारी दरम्यान झाली होती

माजी सैनिकाकडे 60 लाख रुपयांची बचत आणि सेवानिवृत्तीची रक्कम होती. तसेच त्यांने मुलाकडून 40 लाख रुपये घेतले होते. जमा केलेल्या पाच बँकांच्या 12 खात्यांमधून सायबर चोरट्यांनी हे पैसे काढले. लोकांनी अनोळखी व्यक्तीशी कोणताही व्यवहार करु नये, आपले ओटीपी व बँक खात्याची माहिती कोणाला देऊ नये, सोशल मीडियावर आपली वैयक्तीक माहिती देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!