Malegaon News

Malegaon News : खळबळजनक ! मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या

445 0

मालेगाव : मालेगावमध्ये एक धक्कादायक घटना (Malegaon News) घडली आहे. यामध्ये सख्ख्या भावानेच धाकट्या भावाची निर्घृणपणे हत्या केली आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सततच्या भांडणामुळे थोरल्या भावाने धाकट्या भावाचा खून केला आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे.

काय घडले नेमके?
नाशिकच्या मालेगावातील नूरबागमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये सख्ख्या भावानेच चाकू भोकसून 23 वर्षीय तरुण भावाची हत्या केली आहे. जाविद अहमद मोहम्मद जमील असे मृत तरुणाचे नाव आहे.तर मुद्दसीर अहमद मोहम्मद जमील असे आरोपी भावाचे नाव आहे. या दोन्ही भावांमध्ये सतत भांडणे होत होती. या वादातूनच मुद्दसीरने जाविदचा खून केला.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी संशयित मुद्दसीरवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मालेगाव पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!