Consumer Commission : कागदी कॅरीबॅगसाठी ‘या’ ब्रँड स्टोअरने आकारले 7 रुपये ;भरावा लागला 2000 रुपयांचा भुर्दंड

217 0

औरंगाबाद  : प्लास्टिकवर बंदी आल्यापासून अनेक लहान दुकानांपासून ते ब्रँड स्टोअर मध्ये कागदी पिशव्यांचा वापर वाढला आहे . परंतु या कागदी पिशवीसाठी अधिक शुल्क आकारणे औरंगाबाद मधील एका ब्रँड स्टोअरला चांगलंच महागात पडल आहे. 

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार , औरंगाबाद मधील प्रोझोन मॉलमध्ये मॅक्स फॅशन लाइफस्टाइल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आपल्या लोगोसह कागदी पिशवी ग्राहकांना 7 रुपयात देत होते. अशातच ग्राहक अश्विनी धन्नावत यांनी कंपनीच्या विरुद्ध ग्राहक आयोगाकडे तक्रार केली . त्यानंतर ग्राहक आयोगाने या कंपनीला थेट 2000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

याप्रकरणी कंपनीने आपली बाजू मांडताना ग्राहक आयोगात हे प्रकरण चालविता येणार नाही ,असे म्हटले आहे. सरकारने प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातल्यामुळे कागदी पिशव्या द्याव्या लागत आहेत. त्या महाग असल्यामुळे ग्राहकांना त्यांच्या संमतीने सशुल्क पिशवी दिली जाते .ग्राहकांची खरेदी केलेल्या वस्तूबद्दल तक्रार नाही, त्यामुळे ग्राहक आयोगात हे प्रकरण चालविता येणार नाही . असे कंपनीचे म्हणणे आहे.

Share This News
error: Content is protected !!