Gautami Patil

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील विरोधात गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण?

2839 0

सोलापूर : आपल्या नृत्याच्या जोरावर सगळ्यांना वेड लावणाऱ्या गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या विरोधात बार्शी पोलीस ठाण्यात (Barshi Police Station) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. पहिल्यांदाच गौतमीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याने तिच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी गौतमी पाटीलसह कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बार्शीतील कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र गायकवाड (Rajendra Gaikwad) यांनीच ही तक्रार दाखल केली आहे. गौतमी पाटील हिने माझी फसवणूक करून मला मानसिक त्रास दिला. त्यामुळे मी तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, असे कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र गायकवाड म्हणाले आहेत. तसेच गौतमी पाटील सोबत तिचा सहकारी केतन मारणे यांच्याविरोधातदेखील तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कार्यक्रम घेणं महागात पडलं
सोलापूरात (Solapur) गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करणं आयोजक राजेंद्र भगवान गायकवाड यांना चांगलेच महागात पडलं आहे. पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी दिलेली नसताना गौतमी पाटीलचा लावणी कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता त्यांनी थेट कार्यक्रम घेत नियमांचा भंग केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवि कलम 188, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135, 37(3) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!