Jalgaon News

Jalgaon News : जळगावमध्ये एका महाविद्यालयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

1091 0

जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Jalgaon News)रावेर तालुक्यातील वडगाव येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणीने शहरानजीकच्या एका शेतातील विहिरीत उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. शितल मुकेश वाघोदे (वय 19) असे मृत तरुणीचे नाव आहे. मात्र तिने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
रावेर तालुक्यातील वडगाव येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणारी शितल मुकेश वाघोदे (वय 19) ही तरुणी बुधवारी 28 जून रोजी रावेरला कॉलेजला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर गेली ती पुन्हा परत आलीच नाही. रात्री उशीरापर्यंत ती घरी न आल्याने तिच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र,तिचा कुठेच पत्ता लागला नाही. यादरम्यान रावेर तालुक्यातील अजंदा रस्त्याने एका शेतात शेतमजूरीचं काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या शेतात असलेल्या विहिरीजवळ शाळेची बॅग आणि चप्पल आढळून आली. मात्र विहिरीजवळ कुणीही आढळून आले नाही. यानंतर त्यांनी हि माहिती पोलिसांना दिली.

Jalgaon News : मी शिर्डीला जातोय… घरी सांगून तरुणाची स्मशानभूमीत गळफास घेऊन आत्महत्या

या घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत शोध घेतला असता गुरूवारी सकाळी तरुणीचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. यानंतर पोलिसांनी या तरुणीची ओळख पटवली असता ती शीतल वाघोदे असल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली. तेव्हा तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. शीतलने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याव समोर आले नसून पोलीस त्याचा तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!