Coal Scam

Coal Scam: दर्डा पिता- पुत्रांना 4 वर्षांचा कारावास; दिल्ली विशेष न्यायालयाचा निकाल

854 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोळसा घोटाळ्याप्रकरणी (Coal Scam) दिल्ली विशेष न्यायालयाने आज विजय दर्डा आणि देवेंद्र दर्डा या पिता- पुत्रांना 4 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयाने 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा तसेच यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील (Coal Scam) अनियमिततेच्या प्रकरणात चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणात (Coal Scam) न्यायालयाने माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, दोन ज्येष्ठ लोकसेवक केएस क्रोफा आणि केसी सामरिया यांनादेखील 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!