Beed Video

Beed Video : कंडक्टर आणि प्रवासी महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

790 0

बीड : गावाकडे अजूनही वाहतुकीचे साधन म्हणून बसचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सहसा बसमध्ये (Beed Video) प्रवासादरम्यान गर्दी असते त्यामुळे लोकांमध्ये जागेवरुन किंवा इतर कारणांवरुन भांडण (Beed Video) होतं. अशा अनेक घटना समोर येत असतात.सध्या अशीच घटना समोर आली आहे. यामध्ये कंडक्टर आणि प्रवासी महिलांमध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

काय घडले नेमके?
ही घटना बीडमध्ये घडली आहे. यामध्ये बस का थांबवली नाही असं कारण काढून महिला कंडक्टरला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा धक्कादायक प्रकार बीडच्या धारूर आगारात घडला आहे. सध्या या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या प्रकरणात मारहाण करणाऱ्या महिलांविरोधात धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबाजोगावरून बस (एमएच 20, बीएल 125) धारूर आगारात आली असता महिला प्रवाशाने कंडक्टरला ‘अंबाजोगाईत बस का थांबवली नाही’ यावरून शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी कंडक्टर संगीता दिनकर कांबळे यांच्या तक्रारीवरून आरोपी वैशाली अशोक चिरके (रा.जहागीरमोहा, ता.धारूर) यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!