Crime Video

Crime Video : मद्यपी वाहनचालकाने 7 वर्षीय मुलाला 50 फूट फरफटत नेले; CCTV फुटेज आलं समोर

571 0

पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील चरोहली परिसरामधून एक धक्कादायक घटना (Cime Video) समोर आली आहे. यामध्ये एका मद्यपी वाहन चालकाने सात वर्षाच्या मुलाला आपल्या कार खाली जवळपास 50 फूट फरफटत (Cime Video) नेले आहे. पार्थ भोसले असे या अपघातात मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

काय घडले नेमके?
10 ऑगस्ट ला रात्री आठच्या दरम्यान आळंदी – दिघी रोडवर चरोहली परिसरामध्ये ही दुर्दैवी घटना (Cime Video) घडली. या घटनेत राहूल तापकीर या मद्यपी वाहन चालकाला दिघी पोलिसांनी अटक केली आहे. राहुल तापकीर हा दहा तारखेला आठच्या दरम्यान दिघी – आळंदी रोडवर आपल्या अर्टिगा कारमधून मद्य प्राशन करून जात असताना, त्याने सात वर्षाच्या पार्थ भोसले या चिमुकल्याला आपल्या गाडीखाली 50 फूट फरफटत नेले. या घटनेची सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

Share This News
error: Content is protected !!