Chhatrapati Sambhaji Nagar

Chhatrapati Sambhaji Nagar : आईची भेट राहिली अधुरी ! आजारी आईला भेटण्याआधीच तरुणाने घेतला जगाचा निरोप

1278 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar) एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आई आजारी असल्यामुळे 32 वर्षीय तरुण पुण्यावरून आईला भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडकडे निघाला होता. मात्र नियतीला आई आणि लेकराची ही भेट मान्य नव्हती. या तरुणाने अर्ध्या रस्त्यातच काळाने घाला घातला. फरशी फाट्यावर येताच एका भरधाव कारने तरुणाच्या दुचाकीला जोराची धडक दिली आणि या धडकेमध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता घडली.

काय घडले नेमके?
समाधान विठ्ठल राऊत (वय 32, रा. शिवना तालुका सिल्लोड, जि. संभाजीनगर) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. समाधान हा शिक्षित असून त्याचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता. समाधान हा रोजगारासाठी पुणे येथील हॉटेलमध्ये नोकरी करत होता. दरम्यान, समाधानच्या आई काही दिवसांपासून आजारी होती. कुटुंबीयांनी ही बाब समाधानला सांगितल्यानंतर समाधानने हॉटेल मालकाकडून सुट्टी घेऊन शुक्रवारी पहाटे तो आईला भेटण्यासाठी दुचाकीकीने (एमएच 14 जीएक्स 4497) छत्रपती संभाजीनगरकडे निघाला.

संभाजीनगरला पोहोचल्यानंतर संभाजीनगर – जळगाव महामार्गावर सिल्लोडच्या दिशेने जात असताना फुलंब्री गावाच्या समोर असलेल्या फरशी फाटा येथे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास समाधानच्या दुचाकीच्या समोरून येणाऱ्या (एमएच 02 सीआर 3022) या कारने जोराची धडक दिली. यामध्ये समाधान गंभीर जखमी झाला. दरम्यान, त्याला नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आजारी असल्यामुळे मुलगा भेटण्यासाठी येत असल्याची वाट पाहणाऱ्या आईल मुलाचा मृतदेह पाहण्याची वेळ आली. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत समाधनच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक भाऊ असा परिवार आहे. बाजार पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस नाईक रवी देशमुख पुढील तपास करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!