Suicide News

Suicide News : तुळशीपाशी दिवा लावून 20 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

777 0

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही महिन्यांपासून लोकांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण (Suicide News) खूप वाढले आहे. विशेषतः तरुण वर्गामध्ये याचे प्रमाण जास्त आहे. या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide News) केली आहे. ही घटना बुधवार 2 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली आहे. तिने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
तेजस्विनी विष्णू जोशी (वय 20 वर्ष, रा. आयोध्या नगर, बजाज नगर, ज्योतिर्लिंग हाऊस, वडगाव, कोल्हाटी) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तेजस्विनीचे वडील कंपनीत काम करतात तर आई घरी खाजगी शिकवणीचे क्लास घेते. तिला एक भाऊ आहे. तेजस्विनी ही शांत स्वभावाची होती. चांगल्या क्षेत्रात करिअर करायचे असल्यामुळे तिने बारावीनंतर नीटची परीक्षा दिली. मात्र त्या परीक्षेत तिला कमी मार्क मिळाले. यामुळे तिने यावर्षी पुन्हा नीटच्या परीक्षेची तयारी सुरू केली होती.

घटनेच्यावेळी तेजस्विनीचे वडील कंपनीत कामासाठी गेले होते, तर आई घरीच होती. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास तेजस्विनीने तुळशीला दिवा लावला त्यावेळी आई शिकवण्याचे क्लास घेत होती, यावेळी ती रूममध्ये गेली. काही वेळाने आईने तिला आवाज दिला मात्र तिचा प्रतिसाद आला नाही. यानंतर आईने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला असता तेजस्विनी ओढणीने गळफास (Suicide News) घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आली. तिला तात्काळ खाली उतरवत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार अशोक जाधव करीत आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!