Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : उपचार सुरु असताना तरुणाला रॉडने मारहाण; घाटी रुग्णालयामधील घटना

400 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये दोन गटात वाद झाल्यामुळे जखमी तरुणाला घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. जखमी तरुणावर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना दुसऱ्या गटातील काही तरुण तिथे आले आणि त्यांनी जखमी तरुणाला बेदम मारहाण केली. यामध्ये महिला डॉक्टरला रॉड लागल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या या मारहाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयाच्या बाहेर दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. या राड्यामध्ये जखमी तरुणाला घाटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तरुणावर उपचार सुरू असताना दुसऱ्या गटातील काही तरुण रॉड घेऊन उपचार सुरू असलेल्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी त्यांनी जखमी तरुणाला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना देखील रॉड लागला. यात महिला डॉक्टरला डोक्याला रॉड लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

या घटनेमुळे रुग्णालयात मोठी खळबळ उडाली. तसेच बाकी रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर अपघात विभागातील काही निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलं. या घटनेची माहिती घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांना मिळाली असल्याने डॉक्टरांची समजूत काढत दोषींवर कारवाई करण्याचा आश्वासन दिले. यावेळी डॉक्टरांनी संप मागे घेतला. या प्रकरणी प्रशासनाच्या वतीने बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

4 जवानांची हकालपट्टी
घाटी रुग्णालयात अनुचित प्रकार घडू नये यासाठी एम.एस.एफचे जवान तैनात करण्यात आले आहे. मात्र, हा प्रकार सुरू असताना कर्मचाऱ्यांनी कोणतीही मध्यस्थी न केल्याने 4 जवानांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Rohit Sharma : रोहित शर्माने रचला ‘हा’ मोठा विक्रम ! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर हळहळलं ! दोन सख्ख्या भावांसह दोघांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

Pune Police : पुणे पोलिसांची विशेष मोहीम ! रात्रभर गन्हेगारांची धरपकड; तब्बल ‘इतक्या’ गुन्हेगारांना केली अटक

Narendra Modi : नरेंद्र मोदी 2024 मध्ये पंतप्रधान झाले नाही तर मी फाशी घेईन; ‘या’ आमदाराचे मोठे वक्तव्य

Shivadi Nhava Sheva Sea Link : शिवडी- न्हावाशेवा सी लिंकवर ‘या’ गाड्यांना असणार बंदी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!