Chhatrapati Sambhajinagar Crime

Chhatrapati Sambhajinagar Crime : तू मला भेट नाहीतर… रुमवर बोलवून तरुणीवर अत्याचार केले अन्… छत्रपती संभाजीनगर हादरलं !

832 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar Crime) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. “तू मला खूप आवडतेस, तू मला भेट, अन्यथा तुझ्या भावाला जिवंत मारून टाकेन”, अशी धमकी देऊन 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सिल्लोडमध्ये घडली आहे. यानंतर पीडित तरुणीने बदनामीच्या भीती पोटी विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. तर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपीनेदेखील गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
मच्छिंद्र रामू घोडके (वय 25, रा. रेलगाव) असे बलात्कार करून नंतर गळफास घेऊन आयुष्य संपवलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी मच्छिंद्र हा ओळखीच्या 19 वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. मच्छिंद्रने त्या मुलीला “तू मला खूप आवडते, तू मला भेट अन्यथा तुझ्या भावाला जिवंत मारून टाकीन”, अशी धमकी देऊन त्याने 19 वर्षीय मुलीला भाड्याने घेतलेल्या रूमवर बोलवून तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने याबाबत तिच्या आईला सांगितले. यामुळे पीडित तरुणीचा भाऊ आणि आरोपी मच्छिंद्र यांच्यामध्ये हाणामारी झाली. यामध्ये दोघेही जखमी झाले यानंतर मच्छिंद्र घोडके या सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून त्याला छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले. मात्र, आरोपी मच्छिंद्र हा दवाखान्यात न जाता बहिणीच्या घरी गेला.

या सर्व घटनेमुळे पीडित तरुणी घाबरून गेली होती. यामुळे बदनामीच्या भीतीपोटी तरुणीने विषारी द्रव्य प्राशन केले.या घटनेची माहिती मिळताच तरुणीला सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणानंतर पीडितेच्या तक्रारीवरून सिल्लोड पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपीने बहिणीच्या घरामध्ये गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!