Raichur Video

Viral Video : भरधाव कारने शाळेतील विद्यार्थ्यांना उडवले; थरारक Video आला समोर

5140 0

रायचूर : कर्नाटकातील रायचूर या ठिकाणी एक भीषण अपघात झाला आहे. हि संपूर्ण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात (Viral Video) कैद झाली आहे. भरधाव कारने आधी दुचाकीस्वाराला आणि नंतर वेगावर नियंत्रण न आल्याने विद्यार्थ्यांना फरफटत नेल्याचे या व्हिडिओमध्ये (Viral Video) दिसत आहे. कारच्या धडकेत विद्यार्थिनी 15 फूट उंच उडाल्याचे दिसत आहे.

काय घडले नेमके?
कर्नाटकातील रायचूर या ठिकाणी हा भीषण अपघात झाला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका भरधाव गाडीने विद्यार्थ्यांना धडक दिली. गाडीने धडक देताच 15 फूट उडून विद्यार्थिनी खाली पडली. सुदैवाने या भीषण अपघातात या विद्यार्थिनींना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. दुचाकीस्वार कारला धडकल्याने हा अपघात घडला, त्यामुळे दुचाकीस्वाराचा पाय फ्रॅक्चर झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Pimpri Chinchwad Fire : पिंपरी चिंचवडमध्ये मेडिकल दुकानाला भीषण आग; संपूर्ण मेडिकल जळून खाक

यू-टर्न घेत असताना कारने बाईकला धडक दिली. त्याचवेळी कार चालकाने तेथून जाणाऱ्या चार विद्यार्थ्यांनाही धडक दिली. या अपघातात (Viral Video) एक विद्यार्थिनी दूरवर फेकली गेली. या अपघातात अन्य दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना 18 जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.

Share This News
error: Content is protected !!