Buldhana News

Buldhana News : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; धावत्या बसने अचानक घेतला पेट

894 0

बुलढाणा : बुलढाण्यामधून (Buldhana News) एक मोठी बातमी समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर आणखी एक अपघात घडला आहे. समृद्धी महामार्गाचे उदघाटन झाल्यापासून या ठिकाणी अपघातांची मालिका सुरूच आहे. आता समोर आलेल्या दुर्घटनेत चालत्या बसला भीषण आग लागली आहे.

सिद्धी ट्रॅव्हल्सची ही बस अमरावतीहून पुण्याकडे निघाली होती. समृद्धी महामार्गावरील मेहकर परिसरात बसने अचानक पेट घेटला. या बसमधून चालक, वाहकासह एकूण 32 जण प्रवास करत होते. सुदैवानं बसला आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने त्यानं प्रवाशांना सुरक्षीतरित्या बाहेर काढले आणि पुढचा मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

बसमध्ये बसवलेल्या एसी यंत्रणेमध्ये शॉर्टसर्किट होऊन ही आग लागल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहे. योग्य वेळी ही घटना लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. यापूर्वी देखील समृद्धी महामार्गावर बसला आग लागल्याची घटना घडली होती, या घटनेत अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता.

Share This News
error: Content is protected !!