Nashik Accident News

Nashik Accident News: स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे बसचा भीषण अपघात; नाशिकमधील घटना

507 0

नाशिक : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. नाशिक जिल्ह्यात (Nashik Accident News) अशीच अपघाताची घटना समोर आली आहे. देवळा-कळवण रस्त्यावर सप्तश्रृंगी नगराजवळील परिसरात कळवण-मालेगाव ही बस (एमएच 07 सी 9108) गुरुवारी सायंकाळी झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये चालक-वाहकासह बसमधील जवळपास 16 प्रवासी जखमी झाले आहेत.

काय घडले नेमके?
कळवण डेपोची कळवण-मालेगाव बस गुरुवारी देवळा शहरात प्रवेश करण्यापूर्वी सप्तशृंगी नगराजवळ वेगाने येत असताना पहिल्यांदा उजव्या बाजूच्या विजेच्या खांबाला धडक देत त्यांनतर डाव्या बाजूच्या चिंचेच्या झाडावर धडकली. सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. बसची पुढची डावी बाजू दाबली गेली असून, बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यावेळी या बसच्या मागेपुढे कोणतेही वाहन नव्हते त्यामुळे मोठा अपघात टळला आहे.

अपघातातील जखमींची नावे खालीलप्रमाणे
राहुल राजू कचवे (वय ३०, रा. चांदवड), वाय. एस. महाले (वाहक, वय ३०, रा. सुरगाणा), अकबर अली शहा (वय ५०, रा. मालेगाव), भिका रुपसिंग सोळंके (वय ७५, रा. नवेगाव), अरविंद गणपतराव जोंधळे (वय ६५, रा. कोल्हापूर), पांडुरंग शंकर साठे (वय ६४, रा. गडहिंग्लज), पुरुषोत्तम देवबा ठाकरे (चालक, वय ४६, रा. कळवण), हर्षल युवराज पगार (वय २०, रा. खुंटेवाडी), कोमल विकास शिरसाठ (वय २०, रा. देवळा), मोहम्मद मनु (वय २५, रा. मुझफ्फरनगर), सविता भावराव सूर्यवंशी (वय ४३, रा. देवळा), ओंकार बाबासाहेब येरुळे (वय २०, रा. राहुरी), मेहेरदिन अब्दुल गफर (वय ३४, रा. मुझफ्फरनगर), आकाश कृष्णा गांगुर्डे (वय २४, रा. देवळा), लखन हरी सोनवणे (वय ४०, रा. कळवण), योगिता लखन सोनवणे (३५, कळवण), उषाबाई पोपट थोरात (वय ४८, रा. पिंपळगाव) अशी अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Mohol Murder : शरद मोहळ हत्याकांडात मोठा खुलासा ! ‘या’ दिवशी आरोपी एकत्र आले अन् त्यानंतर…;

MIT : एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे 13 वी ‘भारतीय छात्र संसद’ चे माजी उपराष्ट्रपती वैकय्या नायडू यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Latur News : भरधाव कारच्या धडकेत ‘या’ माजी नगराध्यक्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Sharad Mohol Murder : गुन्हेगारी जगतात नव्या बकासुराची एन्ट्री? दोस्तीत कुस्ती करणारे मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे नेमके आहेत तरी कोण?

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलच्या ड्युप्लिकेटची मार्केटमध्ये हवा; नेमकी ‘ती’ लावण्यती आहे तरी कोण?

Sharad Mohol Murder : शरद मोहोळचा खून झाल्यानंतर पहिल्या दीड तासात काय घडलं? समोर आली ‘ही’ महत्वाची माहिती

Ravindra Waikar : ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ आमदाराच्या घरी ईडीचा छापा

Swati Mohol : माझा नवरा वाघ होता, मी वाघीण आहे, स्वाती मोहोळ यांनी घेतली आक्रमक भूमिका

Beed Crime : पतंग काढण्याच्या नादात 9 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Shahajibapu Patil : शेकापकडून शहाजी बापूंचा होमग्राउंडवरच करेक्ट कार्यक्रम! ‘त्या’ निवडणुकीत पत्कारावी लागली हार

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होणार

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!