Bus Accident

Bus Accident : चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने घाटामध्ये बसचा भीषण अपघात; 3 जण जखमी

7451 0

सिंधुदुर्ग : मुंबई ते गोवा अशी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बसचा अपघात (Bus Accident) झाला आहे. बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने करूळ घाटामध्ये बसचा अपघात (Bus Accident) झाला आहे. ही बस प्रवाशांना घेऊन बस गोव्याच्या दिशेने प्रवास करत होती. या अपघातात 3 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमी झालेल्या प्रवाशांवर गगनबावडा येथील ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळताच वैभववाडीचे नायब तहसीलदार आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

काय घडले नेमके?
विनायक ट्रॅव्हल्सची ही बस मुंबईहून गोव्याकडे जात होती. गगनबावड्यापासून काही अंतरावर आल्यानंतर करूळ घाटात या बसचा अपघात झाला. कोल्हापूर मार्गे गोव्याकडे करूळ घाट सुरुवातीला उतरत असतानाच बस गटारामध्ये कलंडली. गगनबावडा येथे आल्यावर काही वेळ ही बस थांबली होती. त्यानंतर गोव्याच्या दिशेने जायला निघाली. परंतु गगनबावडा या ठिकाणावरून निघाल्यानंतर घाटाच्या काही अंतरावर रस्त्याकडेच्या गटारीमध्ये ही बस कलंडली. चालकाचा वाहनावरील ताबा सुटताच तो बाहेर उडी मारून पसार झाला.

या अपघाताची माहिती मिळताच ग्रा.प.सदस्य मुस्ताक वडगावे, संतोष पाटील, गुरुनाथ कांबळे आदींनी घटनास्थळी धाव घेवून व गगनबावडाचे पोलीस निरीक्षक भांडवलकर, वाहतूक पोलीस संजय पवार तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. या अपघाताची नोंद गगनबावडा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!