Bus Accident

Bus Accident : खड्डा चुकवण्याच्या नादात खासगी बसचा भीषण अपघात; 8 जण जखमी

1200 0

वर्धा : राज्यात सध्या अपघाताचे (Bus Accident) प्रमाण खूप वाढले आहे. चालकाच्या चुकीमुळे अनेकवेळा हे अपघात घडत असतात. वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील छोटी आर्वी शिवारात खड्डा चुकवण्याच्या नादात अशाच एका खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला असून यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर इतर 8 प्रवासी जखमी झाले आहेत.

काय घडले नेमके?
हिंगणघाट येथील नागपूर-हैदराबाद महामार्गावर छोट्या आर्वी शिवारातील सगुणा कंपनीजवळ भरधाव ट्रॅव्हल्स पलटली. रस्त्यावरील खड्डा चुकविताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स पलटी झाली. ट्रॅव्हल्स क्रमांक सी. बी. 19 – एफ. 3366 ही हैदराबाद येथून रायपूरला चालली होती. हा अपघात घडला तेव्हा त्या ट्रॅव्हल्समध्ये एकूण 28 प्रवासी प्रवास करीत होते अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

ट्रॅव्हल्स भरधाव वेगात हैदराबादवरून रायपूरकडे जात असताना हिंगणघाट नजीक पोहोचली. मात्र छोटी आर्वीजवळ महामार्गावर असलेल्या खड्ड्यांचा अंदाज चालकाला आला. यावेळी खड्डा चुकविताना चालकाचे ट्रॅव्हल्सवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुंग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!