Burning Car

Burning Car : मुंबई-बंगळुरू महामार्गवर बर्निंग कारचा थरार; Video आला समोर

757 0

पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर पुनावळे या ठिकाणी आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास नागरिकांना बर्निंग कारचा (Burning Car) थरार पाहायला मिळाला. या कारने अचानक पेट (Burning Car) घेतला. ही कार क्षणार्धात जळून खाक झाली. कार चालकाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना घडली तेव्हा या कारने 3 प्रवासी प्रवास करत होते.

Suicide News : आदर्श पतसंस्थेतील 22 लाख बुडाल्याच्या भीतीने शेतकऱ्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

काय घडले नेमके?
एमएच 12, एसक्यू 1552 या क्रमांकाची एक मर्सडिज कार मुंबईच्या दिशेने चाललेली होती. यादरम्यान ही कार पुनावळे येथील साई मिलेनिअम जवळ पोहचली असता या मोटारीच्या सायलेन्सरमधून आग निघत असल्याचे (Burning Car) मागील मोटार चालकाच्या लक्षात आली त्याने समयसुचकता दाखवत मोटार चालकाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.

Train Viral Video : महिलांची लोकल ट्रेनमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; लाथा- बुक्क्यांनी केली मारहाण

यानंतर कार चालकाने तातडीने प्रसंगावधान राखत मोटार बाजूला घेत कारमधील सगळ्यांना खाली उतरवले आणि मोठी जीवितहानी टाळली. मोटारीतील सर्वजण खाली उतरताच मोटारीने मोठा पेट घेतला आणि काही क्षणात संपूर्ण कार जळून खाक झाली. यामुळे काही काळ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. याची माहिती मिळताच वाकड वाहतूक विभागाने क्रेनच्या सहाय्याने मोटार रस्त्याच्या बाजूला करून घेत महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Share This News
error: Content is protected !!