Video Viral

Video Viral : गणपती मिरवणुकीमध्ये वीजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

575 0

बुलढाणा : ओडिशातील कटक शहरात एक धक्कादायक घटना (Video Viral) घडली आहे. यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रॅक्टरमधून गणपतीची मिरवणूक सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. सोहम सावळे असे मृत तरुणाचे नाव असून तो बुलढाण्यातील रहिवाशी होता. तो कटक शहरात एमएससीचे शिक्षण घेत होता.

काय आहे नेमके प्रकरण?
ओडिसातील महाविद्यालयात गणपतीची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कऱण्यासाठी आणली जात होती. गणपतीची वाजत गाजत मिरवणूक ट्रॅक्टरमधून काढत होते. तेव्हा मिरवणुकीत ट्रॅक्टरमध्ये उभा राहून तरुण झेंडा फिरवत होता. झेंड्याला असलेली एल्युमिनिअमची काठी ११ केव्हीच्या वीजेच्या तारांना लागली आणि ट्रॅक्टरमधील चार ते पाच जणांना वीजेचा जोरदार झटका बसला.

यानंतर हे सगळेजण विजेचा धक्का लागताच खाली कोसळले. यात सोहम सावळे याचा जागीच मृत्यू झाला. सोहमच्या मृत्यूमुळे त्याच्या गावी शोककळा पसरली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

Share This News
error: Content is protected !!