Buldhana News

Buldhana News : मित्रांसोबत पिकनिकला गेला आणि जीवानिशी मुकला

724 0

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून (Buldhana News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana News) संग्रामपूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र वारी भैरवगड या ठिकाणी आडनदी पात्रातील रांजण्या डोहात एका 16 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अनिकेत संजय मुरोदे असे मृत तरुणाचे नाव असून तो अकोला जिल्ह्यातील हीवरखेड येथील रहिवासी आहे. अनिकेत हा वारी हनुमान जवळील रांजण्या डोहात मित्रांसोबत पोहायला गेला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

पिकनिक बेतली जीवावर
अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वारी हनुमान हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथे पाण्याचे डोह आहेत. शनिवार आणि रविवारी येथे अनेक पर्यटक पिकनिकसाठी आणि डोहात अंघोळीचा आनंद लुटण्यासाठी येतात. तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील अनिकेत देखील रविवारी सुट्टी असल्याने मित्रांसोबत वारी हनुमान येथे पिकनिकला गेला होता.

यादरम्यान (Buldhana News) रांजण्या डोहात सर्व मित्र पोहण्यासाठी उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने अनिकेत पाण्यात बुडाला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्यात येत होता. तब्बल 18 तासांनंतर अनिकेतचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आपल्या तरुण मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!