पुणे : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ समृद्धी महामार्गावर (Buldhana Bus Accident) शनिवारी पहाटेच्या सुमारास खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात (Buldhana Bus Accident) एकूण 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या 25 जणांची ओळख पटवणेदेखील अवघड झाले होते. 25 पैकी 24 मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. या मृतांमध्ये 7 जण पुणे शहरातील होते. यामध्ये गंगावणे अन् वनकर कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. तसेच अजून धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये 2 वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे.
Satara Accident : साताऱ्यामध्ये देखील खासगी बसचा भीषण अपघात; 1 ठार तर 4 जण जखमी
वनकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर
पुणे येथील पिंपळे सौदागर येथील जरवरी सोसाटीतील राहणाऱ्या वनकर कुटुंबावर या अपघातामुळे (Buldhana Bus Accident) मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. या अपघातात शोभा वनकर (वय 60), वृषाली वनकर (वय 38) आणि ओवी वनकर (वय 2 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
गंगावणे कुटुंबावर दु:खाचा डोंगर
पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील गंगावणे कुटुंबियांतील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. प्राध्यापक कैलास गंगावणे (वय 48 ), त्यांची पत्नी कांचन गंगावणे (वय 38) आणि मुलगी सई गंगावणे (वय 20) या तिघांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. कैलास गंगावणे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहे. तर त्यांची मुलगी सई वैद्यकीय अभ्यासक्रमाला शिकत होती.
Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृत व्यक्तींची नावे आली समोर
अपघातात (Buldhana Bus Accident) मृत्यू झालेल्या राजश्री प्रकाश गांडोळे याही पुणे शहरातील रहिवाशी आहेत. त्यांच्या मुलास काही आवश्यक कागदपत्रांची गरज पडल्याने ते पती पत्नी गावी आर्वी येथे आले होते. पती प्रकाशराव गांडोळे यांना सोडून राजश्री एकट्याच पुणे येथे जात होत्या मात्र नियतीने घात केला आणि त्यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.