Jalna Bribe

Bribe News: ब्लॅकडॉग दारूचे 2 खंबे द्या लगेच सही देतो; ग्रामसेवकाची अजब मागणी

698 0

जालना : राज्यात भ्रष्टाचाराचे (Bribe News) प्रमाण खूप वाढले आहे. हल्ली छोट्यातल्या छोट्या कामासाठी लोकांना लाच (Bribe News) द्यावी लागते. जालना जिल्ह्यातील बदनापूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भूमिगत नालीच्या बांधकामाची रक्कम अदा करण्यास परवानगी देण्यासाठी ग्रामसेवकाने लाच मागितली. सध्या त्याने लाच म्हणून जी मागणी केली आहे त्याची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. या ग्रामसेवकाने सात हजार रुपये आणि ब्लॅकडॉग दारूचे दोन खंबे लाच म्हणून मागितले.

Malad Crime News : मालाडमध्ये रिक्षात महिलेचा विनयभंग; 12 तासात आरोपीला अटक

ग्रामसेवकाकडून लाचेची मागणी
बदनापूर तालुक्यातील मांजरगाव भूमिगत नाली बांधकाम करण्यात आले आहे. या कामाचे उर्वरीत 1 लाख 48 हजार 467 रुपयांचा निधी बांधकाम करणारे मजुरांना व बांधकाम साहित्य देणारे दुकानदार यांना अदा करावयाची होती. त्यासाठी परवानगी लेटरवर गट विकास अधिकारी, पंचायत समिती बदनापूर यांची सही घेण्याची गरज होती. ही सही देण्यासाठी आलोसे सिद्धार्थ घोडके यांनी 20 जून रोजी तक्रारदार यांना पंचासमक्ष 7 हजार रुपयांची लाचेची (Bribe News) मागणी केली.

Chhagan Bhujbal Threat : भुजबळांना धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक

या प्रकरणातील आरोपी सिध्दार्थ घोडके व ग्रामसेवक अंबुलगे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन बदनापूर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!