Mumbai Video

Mumbai Video : देव तारी त्याला कोण मारी ! आधी स्कुटीला धडकला, मग रिक्षाच्या चाकाखाली आला चिमुकला

991 0

विरार : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. कधी चालकाच्या स्वत:च्या चुकीमुळे अपघात (Mumbai Video) घडतात, तर कधी दुसऱ्याच्या चुकांमुळे अपघात होत असतात. यामुळे रस्त्यावरून चालणेदेखील कठीण झाले आहे. कारण कधी काय घडेल याचा काही नेम नाही. सध्या अशीच एक घटना विरारमध्ये घडली आहे.

काय घडले नेमके?
देव तारी त्याला कोण मारी हि म्हण तुम्ही ऐकलीच असेलच त्याचा प्रत्यय या घटनेत आला आहे. विरारच्या अर्नाळा गावात पळत सुटलेल्या एका लहान मुलाचा भीषण अपघात झाला आहे. ही संपूर्ण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शुक्रवारी सकाळी 9 च्या सुमारास अर्नाळा कोळीवाडा किल्ला रोड ते पारनाका या मुख्य रस्त्यावर ही घटना आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
तीन मुले मुख्य रस्त्याकडे पळत येत असताना एक मुलगा वेगात येणाऱ्या स्कुटी वर आदळून, समोर येणाऱ्या रिक्षाच्या समोरील चकाखाली येतो. सुदैवाने यात दैव बलवत्तर म्हणून मुलगा वाचला असून तो किरकोळ जखमी झाला आहे. स्थानिकांनी मुलाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समोर आले आहे.

Share This News
error: Content is protected !!