Pimpri - Chinchwad News

Pimpri – Chinchwad News : जुन्या रागातून तरुणाची टोळक्यांकडून हत्या; पिंपरी -चिंचवडमध्ये खळबळ

1093 0

पिंपरी – चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri – Chinchwad News) निगडी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बुधवारी मध्यरात्री पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पिंपरी-चिंचवड येथील निगडीमधील ओटास्कीम या ठिकाणी ही घटना घडली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
आकाश दूनधव (वय 22 राहणार ओटास्कीम, निगडी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेत त्याच्याबरोबर त्याचा साथीदारदेखील गंभीर जखमी झाला आहे. आनंद उर्फ दादा राजू गवळी असे त्याच्या साथीदाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार निगडीमधील ओटास्कीम येथे बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारात मागील वादाचा राग मनात धरून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला केला आणि फरार झाले. या हल्ल्यात आकाश गोरख दुनघव याचा मृत्यू झाला आणि आनंद उर्फ दादा राजू गवळी हा तरुण गंभीर जखमी झाला.

या घटनेनंतर मृत आकाशच्या नातेवाईकाने आरोपीला जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचे ठरवले आणि सर्वजण निगडी पोलिस स्टेशन येथे जमा झाले. यानंतर निगडी पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकारी यांना तात्काळ कारवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्याचे कबुल केले. निगडी पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मृत आकाश आणि आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने जुन्या वादातून ही हत्या झाली असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

Share This News
error: Content is protected !!