क्राईमठळक बातम्या

#Bombay High Court : एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना मुंबई हायकोर्टाचा दणका

मुंबई : अँटिलिया बॉम्ब प्रकरणात मुंबई हायकोर्टाने एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना दणका दिला आहे. मुंबई हायकोर्टाने प्रदीप शर्मा यांचा दाखल करण्यात आलेला जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

माझी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्यावर एनआयए NIA ने गंभीर आरोप केले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांचे माजी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली होती. मुंबई हायकोर्टने आता प्रदीप शर्मा यांचा जामीन अर्जाळ फेटाळल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.