Ambarnath Blast

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू (Video)

990 0

अंबरनाथ : मुंबई जवळील अंबरनाथ एमआयडीसीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये वडोल एमआयडीसी परिसरामध्ये ब्लु जेटमध्ये भीषण स्फोट झाल्याने कंपनीला भीषण आग लागली आहे. या भीषण दुर्घटनेत एका जणाचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.

काय घडले नेमके?
एमआयडीसी परिसरामध्ये एका केमिकल कंपनीमध्ये स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर कंपनीला आग लागली. आग इतकी भीषण होती की, दूरपर्यंत धुराचे लोट पसरले होते. या परिसरात दूरपर्यंत केमिकल पसरले होते. केमिकल आजूबाजूच्या परिसरात पसरल्याने नागरिकांना डोळ्यांची जळजळ आणि श्वास घ्यायला त्रास होत होता.

या भीषण दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर 4 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या दाखल झाल्या आहेत. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र ही भीषण आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!