accident

बुलढाण्यामध्ये बाईक आणि कारची धडक होऊन भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू

414 0

बुलढाणा : बुलढाण्यामध्ये एक भीषण अपघात झाला आहे. बाईक आणि कारची धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये बाइकवरील 3 जण व कारमधील 1 जण यांचा जागीच मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. खामगाव-मेहकर मार्गावरील देऊळगाव सकर्शा गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे.

काय घडले नेमके?
देऊळगाव साखरशा येथील शेख इरफान हुसेन, सचिन नहार आणि लक्ष्मण गवई हे तिघेजण आपल्या दुचाकीने जात होते. यावेळी दुचाकीचा वेग जास्त असल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती दुचाकी एका इंडिका कारला जाऊन धडकली. यादरम्यान मागच्या बाजूने येणाऱ्या बोलेरो चालकाने दुचाकीस्वारांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती पलटी झाली.

या भीषण अपघातात दुचाकीवरील शेख इरफान हुसेन, सचिन नहार आणि लक्ष्मण गवई या तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. तसंच कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्यांमध्ये इजाज पठाण नावाची व्यक्ती गंभीर जखमी झाल्याने तिला पुढील उपचारांसाठी अकोला येथे हलवण्यात आले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!