Viral Video

Viral Video : छोट्या दिरासोबत लग्न करण्यासाठी दोन वहिनींमध्ये तुफान राडा

1622 0

बिहार : वृत्तसंस्था – बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये दोन महिला एका पुरुषासाठी एकमेकींशी भांडताना दिसत आहेत. या महिला ज्याच्यासाठी भांडताना दिसत आहेत ती व्यक्ती दुसरी तिसरी कोण नसून या महिलांचा छोटा दीर आहे आणि त्या दोन महिला एकमेकांच्या वहिणी आहेत. आश्चर्य वाटले ना हे ऐकून चला तर मग जाणून घेऊया हे प्रकरण नेमकं काय आहे?

बिहारच्या नालंदा येथून हा मारामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात दीरासोबत लग्न करण्यावरून दोन वहिणींमध्ये जोरदार मारामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन्ही महिलांना त्यांच्या धाकट्या दीराशी लग्न करायचे होते. त्यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. हे भांडण एवढं वाढली की दोघांमध्ये तुफान मारामारी झाली. या गावात राहणाऱ्या हिरेंद्र पासवानच्या मोठ्या भावांच्या पत्नींना त्याच्याशी लग्न करायचे होते. हिरेंद्रच्या एका भावाचा आजाराने मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याच्या विधवेचे लग्न हिरेंद्रशी व्हावे, अशी आई-वडील आणि गावकऱ्यांची इच्छा होती. तर दुसऱ्या भावाच्या पत्नीला मालमत्तेच्या लालसेपोटी आपल्या दीराशी लग्न करायचे होते. मात्र दोघांमध्ये वाद वाढला आणि हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचले. सध्या या प्रकरणाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

सुरुवातीला दोन्ही महिलांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर वाद वाढता वाढता हे प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. दोघांनी एकमेकांनी जोरदार लाथा-बुक्क्या मारहाण केली. या मारामारीत दोघांनाही किरकोळ दुखापत झाली. दोघांच्या हाणामारीत इतर कुटुंबीय सहभागी झाले होते. हाणामारी वाढण्यानंतर गावातल्या लोकांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण वाद काही मिटत नव्हता. शेवटी गावकऱ्यांनी भांडणात उतरुन दोन्ही बाजू शांत केल्या तेव्हा कुठे ही हाणामारी थांबली. सध्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide