भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (Satish Wagh Murder Case) यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सतीश वाघ यांचा खून पाच लाखांची सुपारी देऊन करण्यात आला होता. आणि हा खून त्यांचाच पूर्वीचा भाडेकरू असलेल्या व्यक्तीनेच घडवून आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कोण आहे सूत्रधार ?
मिळालेल्या माहितीनुसार, सतीश वाघ त्याच्या खुनाचा मुख्य सूत्रधार त्यांचाच पूर्वीचा भाडेकरू असल्याची माहिती समोर आली आहे. अक्षय जावळकर असं या सूत्रधाराचं नाव आहे. काही वर्षांपूर्वी अक्षय हा सतीश वाघ यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहायला आला होता. मात्र काही दिवसांनी अक्षय आणि सतीश वाघ यांच्यात वाद झाले. या वादातून अक्षय ने वाघ यांना ठार करण्याचा प्लॅन रचला. त्याने चार ते पाच दिवसांपूर्वीच पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे, विकास शिंदे यांच्यासह इतर आरोपींना पाच लाखांची सुपारी दिली होती.
सुपारी दिल्यानंतर या सर्वांनी मिळून हत्येचं प्लॅनिंग केलं. वाघ घरातून बाहेर किती वाजता पडतात ? कुठे जातात? एकटे कधी असतात ? याचा संपूर्ण अभ्यास या आरोपींनी केला. व ठरल्याप्रमाणे मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या वाघ यांचे अपहरण करून त्यांचा पुढच्या काही वेळातच खून करण्यात आला. त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटातील झुडपांमध्ये टाकून दिला.
सतीश वाघ यांचा खून केल्याप्रकरणी भाडेकरू अक्षय जावळकर याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह इतर तीन आरोपी पोलिसांच्या अटकेत असून या सर्वांची कसून चौकशी केली जात आहे.
SATISH WAGH MURDER: आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाची झाली का झाली हत्या;‘हे’ कारण आलं समोर