बदलापूर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; अखेर आरोपीने दिली गुन्हाची कबुली, साक्षीदारही तयार; वाचा सविस्तर

215 0

12 व 13 ऑगस्ट रोजी बदलापूर येथील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन 4 वर्षांच्या विद्यार्थिनींवर 23 वर्षीय सफाई कर्मचाऱ्याने शौचालयात लैंगिक अत्याचार केले. यातील एका मुलीने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याची तक्रार कुटुंबीयांकडे केल्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आलं होतं. याच प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती मिळाली आहे.

आरोपीची वैद्यकीय तपासणी सुरू असताना या तपासणीदरम्यान आरोपीने आपण गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याचं डॉक्टरांसमोर मान्य केलं आहे. याबाबतची एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली असून न्यायालयामध्ये या डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरणार असल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे.

बदलापूर प्रकरणात पोलिसांनी विशेष न्यायालयात आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये वैद्यकीय तपासणी दरम्यान तिथे हजर असलेल्या डॉक्टरांसमोर आरोपीने आपला गुन्हा कबूल केल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी डॉक्टरांचा जबाब नोंदवला आहे. त्यामुळे आता डॉक्टरांची साक्ष या प्रकरणात महत्त्वाची ठरणार आहे. त्याचबरोबर शाळेतील इतर कर्मचाऱ्यांचे जबाबही महत्त्वाचे ठरणार आहेत. आरोपीला लवकर आणि कठोर शिक्षा देण्यासाठी डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!