माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटातील सहभागी असल्याचा आरोप असलेल्या शुभम व प्रविण लोणकर यांच्याशी संबंधित चौघांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली.
रुपेश मोहोळ, करण साळवे, शिवम कोहोळ, रियान खान अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. या चारही जणांना कर्वेनगर परिसरातून ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. या चौकशीतून मोठे धागेदोरे हाती येण्याची शक्यता आहे.
यापूर्वी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पुण्यातून लोणकर डेअरीचा मालक आणि गुंड शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर याला अटक केली होती. प्रवीण लोणकर यांच्या याच लोणकर डेअरीच्या शेजारी असलेल्या भंगारच्या दुकानात बाबा सिद्दिकी यांचे मारेकरी काम करत होते. त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात आणखी कोण कोण सहभागी आहे याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.