Bhiwandi

4 वर्षीय बालिकेचा चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू; चालक व्हिडीओ पाहण्यात मग्न

844 0

ठाणे : सोशल मीडियाचे व्यसन आपल्या किती अंगलट येते ते या घटनेवरून तुमच्या लक्षात येईल. यामध्ये कारचालक मोबाईलवर व्हिडिओ पाहून कार मागे घेत होता. यादरम्यान अचानक कारच्या मागच्या बाजूने खेळत असलेल्या एका चार वर्षीय बालिकेच्या अंगावर कारचे चाक जाऊन तिचा मृत्यू (Accident) झाला आहे. ही घटना भिवंडीतील एका हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये एका लग्नाच्या सभारंभादरम्यान घडली आहे. या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात कार चालकावर गुन्हा (Crime) दाखल करून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

काय घडले नेमके?
अलिना अकरम मंसूरी (वय 4) (Alina Akram Mansoori) असे मृत पावलेल्या बालिकेचे नाव आहे. मात्र या घटनेमुळे लग्न समारंभात दुःखाचा सावट पसरले. भिवंडी शहरातील हाय प्रोफाईल सोसायटी असलेल्या बागे यूसुफ इमारतीच्या 12 मजल्यावर राहणाऱ्या समसुल्लाह मंसूरी यांच्या मुलाचा निकाह समारंभ 5 जून रोजी सायंकाळच्या सुमारास होता. त्या निकाह सभारंभाची तयारी सुरू असतानाच, सभारंभासाठी अनेक पाहुणे मंडळी आली होती. या कार्यक्रमासाठी नालासोपाराहुन मोहम्मद अकरम मंसूरी हे मृत बालिकेचे वडील परिवारसह सायंकाळी 7 च्या दरम्यान आले होते. याचवेळी अजून एक कुटुंब आले हे कुटूंब कार मधून उतरले. त्यानंतर चालक कार घेऊन पार्किंगमध्ये उभी करण्यासाठी जात होता.

यादरम्यान त्याने कार चालकाने कारच्या काचा लावून व्हिडीओ पाहतंच कार रिवर्समध्ये घेतली. यावेळी चालक व्हिडीओ पाहण्यात गुंग असल्याने त्याचे लक्ष कार मागे खेळणाऱ्या मुलांवर नव्हते. यावेळी मृत अलीना कारच्या मागे खेळण्यात मग्न होती. त्याच वेळी अचानक चालकाने कार रिवर्स घेतली आणि अलीनाला जोरदार धडक दिल्याने ती फॉर्च्यूर कारच्या मागच्या चाकाखाली चिरडली गेली. यावेळी लोकांनी चालकाला जोरजोरात आवाज देऊन कार थांबविण्यास सांगितले मात्र चालक मोबाईल पाहण्यात मग्न असल्याने त्याचा काहीच उपयोग झाला नाही. यानंतर लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन बालिकेला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी मृत बालिकेचे वडील मोहम्मद अकरम मंसूरी यांच्या तक्ररीवरून कार चालकावर गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!