भंडारा बलात्कार प्रकरण : विमान हवेत १० मिनिटे थांबवणाऱ्यांना SP लवकर आणायचा असतो माहिती नाही ? शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

644 0

पुणे : भंडा-यातील घडलेल्या बलात्काराच्या घटनेचा निषेध करून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की , भंडारा ,गोंदिया ,नागपूर या तीनही जिल्ह्यांचा दौरा केला . पोलिसांना शिवसेनेच्या शिष्ट मंडळासह भेटले. तिकडे जे दुर्दैवी घटना घडली ती वाईट आहे .

अन्नाच्या शोधात ती महिला पोलीस स्टेशन मधून बाहेर पडली. तिला वेळीच अडवले असते तर अनर्थ टळला असता . ३० तारखेला ती घराबाहेर पडली . त्यावेळी तिच्यावर पहिला अतिप्रसंग घडला होता . या प्रकरणातील आरोपी श्रीराम उरकुडे अद्याप पोलिसांच्या ताब्यात नाही . असे देखील त्यांनी सांगितले आहे . याप्रकरणी संताप व्यक्त करून विमान हवेत १० मिनिटे थांबवणारे लोक आहेत . एस पी लवकर आणायचा असतो ,हे त्यांना माहिती नाही…! अशी टीका शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

भंडाऱ्यातील ही अत्यंत खेदजनक आणि माणूसकीला काळीमा फासणारी घटना आहे. 30 आणि 31 तारखेला ही महिला पोलिसांना एका पुलाखाली सापडली होती . पीडितेला लाखनी गावच्या महिला पोलीस पाटीलने लाखनी पोलीस स्टेशनमध्ये आणलं होतं . ही महिला दोन दिवसांपासून उपाशी होती ,असं समजतं आहे. भर पोलीस स्टेशन मधून ही महिला अन्नाच्या शोधात पोलीस स्टेशन मधून बाहेर पडली . आधीच मनस्थिती खराब असताना ही महिला पोटाची खळगी भरण्यासाठी म्हणून बाहेर पडली , परंतु पोलीस स्टेशन मधून ती बाहेर पडताना तिच्यावर कोणाचे लक्ष सुद्धा जाऊ नये ही नवल गोष्ट आहे . त्यानंतर एक तारखेला ही महिला एका धाब्याजवळ असताना दोन मद्यपींनी तिला जंगलात नेले आणि तिच्यावर अतिप्रसंग केला . त्यानंतर आणखीन एका अज्ञाताने तिच्यावर अत्याचार केल्याचे समजले आहे . याप्रकरणीच शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Share This News
error: Content is protected !!