सावधान ! डिजिटल कर्ज देणाऱ्या ॲपवरून कर्ज घेताय ? आधी ही माहिती जाणून घ्या (VIDEO)

426 0

डिजिटल कर्ज : आजकाल सर्वकाही डिजिटल झालंय.अगदी भाज्यांच्या खरेदी पासून ते मोठमोठ्या खरेदी डिजिटल स्वरूपात केल्या जातात. स्मार्टफोनवर सर्व गोष्टी सहज उपलब्ध होतात. ज्याचा आपण सर्वच लाभ घेतो. प्लेस्टोअर मध्ये हजारो लाखो अँप्लिकेशन्स आहेत ज्यांचा वापर करून आपण शॉपिंग सारख्या अनेक गोष्टी करतो पण यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डिजिटल लोन अँप्स. सध्या लोन अँप्लिकेशन्सद्वारे फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. नेमकी कशी फसवणूक होते. या लोन ॲपला सुशिक्षित नागरिकही कसे बळी पडतात ? सायबर सेलकडून काय आवाहन करण्यात आलं आहे या खास माहितीतून सविस्तर जाणून घेऊया.

प्लेस्टोअरवर जवळपास ६०० डिजिटल लोन अँप्लिकेशन् आहेत यातील बरेच अँप्स रजिस्टर देखील नाहीत. त्यामुळे अश्या अँप्सवर विश्वास ठेवणे कठीणच असते.बरेच लोक असे अँप्स डाउनलोड करतात व फसतात. हे अँप्स स्वस्तात लोन देण्याची आश्वासनं देतात व लोकांना लुबाडतात. कोरोनामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, कर्जबाजारी झाले, आजारावर उपचारात पैशांचा तुटवडा झाला. या कारणांमुळे लोक अश्या अँप्सच्या आहारी जाऊ लागले. लोन अँप्सचे हे जाळे सध्या मोठ्या प्रमाणावर वाढत चाललं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार , देशात अश्या तक्रारींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याबाबत पुणे सायबर सेलकडून देखील माहिती जाणून घेतली. नागरिक कसे फसले जातायेत पाहूया.

डिजिटल लोन अँप्सवरून आपली माहिती कशी घेतली जाते तर प्लेस्टोअर वरून लोक असे अनेक अँप्स डाउनलोड करतात जे तुमची माहिती लीक करू शकतात. तुम्ही या अँप्सला जेव्हा तुमच्या मोबाईल मधील फोल्डर्सचा ऍक्सेस देतात तिथेच तुम्ही फसतात. हे अँप्स तुमची फोन मधील गुपित माहिती,फोटो , तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधील नंबर वापरतात.इतकेच नाही तर फ्रॉड अँप्स तुमचे बँकेचे sms वाचतात व तुम्ही जर लोन काढले असेल त्याचा EMI due असेल तर ती माहिती चोरून तुम्हाला फोन करतात व लवकरात लवकर EMI लगेच भरण्यास सांगतात. त्यानंतर ते एक लिंक पाठवतात आणि त्यावरून तुम्हाला पैसे भरायला सांगतात व तुम्ही या लिंकवर क्लिक केल्यावर तुमचे बँकेतील पैसे लंपास करतात. काही वेळा लोन देण्याअगोदर तुमच्याकडून ऍडव्हान्स पैसे मागितले जातात. पण यापासून सावध रहा कारण कोणतीही बँक किंवा लोन देणारी कंपनी लोन देण्याआधी कोणतेही शुल्क आकारत नाही.

  • कोणत्याही ॲपचा वापर करण्याआधी तो आरबीआय सोबत रजिस्टर आहे की नाही हे पडताळणे आवश्यक आहे
  • जर ॲप रजिस्टर असेल तर केंद्रीय बँक कोणत्याही चुकीच्या बाबतीत त्वरित कारवाई करेल
  • जर डिजिटल कर्ज देणाऱ्या ॲप्स वरून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांची फसवणूक झाली तर त्वरित स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा
  • कोणत्याही एका संदेशाचा किंवा लिंकच्या मदतीने कोणतीही बँक तुमच्या कडून कर्ज वसूल करत नाही त्यामुळे कर्जवसुलीच्या नावाने असे मेसेज आले तर सावध व्हा
  • मेसेज पाठवण्यापूर्वी बँक मेल पाठवतो त्या बँकेचा रिकवरी एजंट तुम्हाला कॉल करतो एका मेसेजच्या मदतीने बँक तुमच्याकडून कर्ज वसूल करत नाही
  • अनोळखी फोन नंबर वरून मेसेज मध्ये लिंक असेल तर चुकूनही त्यावर क्लिक करू नका
  • अनोळखी नंबरवरून असा फसवणुकीचा कॉल आला तर तक्रार करून ब्लॉक करा
  • शक्यतो डिजिटल ॲपवरून लोन काढताना त्या ॲपची संपूर्ण माहिती घ्या
  • कोणताही ॲप इन्स्टॉल करताना कॉन्टॅक्ट इमेज लोकेशन अशा परवानग्या देऊ नये

अशा फसवणुकीत वाढ होत असली तरी ऑनलाईन लोनचा विचार करत असाल तर नेहमी सावध राहा.कुठलही ॲप डाऊनलोड करण्याआधी त्याची पडताळणी करा. ही माहिती तुम्हाला निश्चित फायदेशीर ठरणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!