बीड : बीडमध्ये (Beed News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये दसऱ्यानिमित्त कपडे धुण्यासाठी गेलेले सख्खे बहीण-भाऊ पाण्यात बुडत असताना त्यांना वाचवण्यासाठी आईने धाव घेतली. आईचा आरडाओरडा ऐकून शेजारी असलेल्या एका तरुण मुलगाही त्यांना वाचवण्यासाठी गेला. या घटनेत मुलाला दोन मुलांच्या आईला वाचनात यश आलं. मात्र, दुर्दैवाने दोघे बहिण भाऊ आणि युवक अशा तिघांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला.
काय घडले नेमके?
केस तालुक्यातील केज शहरातील गणेश नगर भागात ही घटना घडली असून वाघमारे व घोडके ही शेजारी राहत असलेली दोन्ही कुटुंबे दसऱ्यानिमित्त कपडे धुण्यासाठी केज बीड रोडवरील रमाई नगरच्या तिरुपती मंगल कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या खदानीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. कपडे धुऊन झाल्यानंतर दुपारी 4 च्या सुमारास त्याच वेळी रोहित गजानन वाघमारे वय वर्ष 11 तर वैष्णवी गजानन वाघमारे वय वर्ष 12 आणि सोमेश्वर गजानन वाघमारे वय वर्ष 15 हे पाण्यात बुडत असताना त्यांना वाचण्यासाठी त्यांची आई उषा गजानन वाघमारे ही आक्रोश करून त्यांना वाचवण्याचा स्वतः प्रयत्न करत पाण्यात उतरली.
यानंतर त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारील उभा असलेल्या अविनाश संतोष घोडके वय वर्ष 18 याने हा सगळा प्रकार पाहता त्या दिशेने धाव घेत पाण्यात उडी मारली. मात्र, उषा गजानन घोडके यांना बाहेर काढलं आणि रोहित वाघमारे या दोघांना वाचवण्यात यश आलं. मात्र, यामध्ये सोमेश्वर आणि वैष्णवी यांना वाचवित असताना खर्राणीतील पाण्यात बुडून अविनाश यालादेखील आपला जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील पोलीस जमादार श्रीकांत चौधरी यांनी आपल्या टीमसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. लोकांच्या मदतीने पाण्यात बुडलेल्या तिन्ही लोकांचे मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज याठिकाणी पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.