Beed Accident

Beed Accident : उच्च शिक्षणाचं स्वप्न राहिलं अधुरं; शिक्षणासाठी कर्ज घेण्यासाठी जात असतानाच तरुणीचा घात

1237 0

बीड : बीडमधून (Beed Accident) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये आपल्या उच्चशिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज काढण्यासाठी गेलेल्या तरुणीचा अपघाती मृत्यू झाला आहे. स्वाती शेषेराव गोंडे असे अपघातात मृत पावलेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे स्वातीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडले नेमके?
बीड जिल्ह्यातील चिंचोटी येथे शेतकरी शेषनारायण गोंडे राहतात. त्यांची मुलगी स्वाती गोंडे हिचा एम फार्मसी या शाखेसाठी सातारा येथील महाविद्यालयात नंबर लागला होता. मात्र, घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने स्वातीने शैक्षणिक कर्ज काढण्याचे ठरवले होते. यासाठी स्वाती शैक्षणिक कर्ज काढण्यासाठी वडवणी येथील शासकिय एसबीआय बँकेत कर्ज प्रकरणासाठी आली होती. बँकेतील आधिकारी शेत व घराची पाहणी करण्यासाठी जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडकी दिली. यामध्ये स्वातीला आपला जीव गमवावा लागला.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आरोपी ट्रकचालकाला अटक केली आहे. याप्रकरणी वडवणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत स्वाती हिचा मृतदेह जिल्हा रुग्णालय बीड येथे श्वविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे चिंचोटी ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Share This News
error: Content is protected !!